Thursday, November 20, 2008

आरक्षण विरोधकांना निवडणुकीत आडवे करणार - विनायक मेटे
औरंगाबाद, ता. १६ - मराठा समाजाचा इतर मागासवर्गीयांत समावेश करून मराठा म्हणूनच सर्व क्षेत्रांत २५ टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी रविवारी (ता. १६) येथे केली. आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना येत्या निवडणुकीत आडवे केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. मराठा समन्वय समितीतर्फे घेण्यात आलेल्या मराठा आरक्षण परिषदेचे उद्‌घाटन श्री. मेटे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष किसनराव डे, छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. देवीदास वडजे, अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे अध्यक्ष विजयसिंह महाडिक, सुरेश माने, शंभूराजे युवा क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष सुनील मोरे, आदर्श बॅंकेचे संस्थापक ए. ए. मानकापे, विष्णू गाडेकर, परशुराम वाखुरे, माजी महापौर सुदाम सोनवणे, नगरसेवक काशीनाथ कोकाटे, संजय तायडे, मिलिंद पाटील, दिलीप पेरे, मनोज पाटील आदी या वेळी उपस्थित होते. मराठा समाजाला राज्यकर्ता, जमीनदार, वतनदार अशी विशेषणे लावली जात असली, तरी वस्तुस्थिती तशी नसल्याचे श्री. मेटे यांनी स्पष्ट केले. सत्तेच्या खुर्चीला चिकटलेले मूठभर पुढारी सोडले, तर रोजगार हमी योजनेवर जाणारा शेतमजूर, आत्महत्या करणारा शेतकरी, बेरोजगार युवक यांच्यासाठी आरक्षणाची लढाई लढायची असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यातील २८८ आमदारांपैकी मराठा फक्त ११३ आहेत. जिल्हा परिषदांच्या ३३ अध्यक्षांपैकी नऊ, तर नगरपालिकांच्या २७० अध्यक्षांपैकी ४४ अध्यक्ष मराठा समाजाचे आहेत. राज्याचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकपद भूषविण्याचा मान मराठा समाजाच्या व्यक्तीस फक्त एकदाच मिळाला आहे. मंत्रालयातील दीडशे सचिवांपैकी सातजण मराठा आहेत. अशा परिस्थितीत सुंभ जळाला, तरी पीळ कायम, अशा गुर्मीत मराठा वावरत असल्याचे श्री. मेटे यांनी सांगितले. भुजबळ, मुंडे आदी "ओबीसी' नेत्यांना मराठ्यांची मते पाहिजे असतील, तर त्यांनी "ओबीसी'चेच नव्हे, तर मराठ्यांचेही नेते व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. नागपूरच्या विधिमंडळ अधिवेशनात हा प्रश्‍न मार्गी लागला नाही, तर राज्य सरकारला सळो की पळो करण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसने मराठा आरक्षणास पाठिंबा दिला आहे. भाजपने पाठिंब्याची भूमिका घेतली आहे; परंतु शिवसेनेने मात्र याबाबत निर्णय घेतलेला नाही. ग्रामीण भागातील मराठा तरुणांच्या मतांवर मोठ्या झालेल्या शिवसेनेने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. मराठा समाजात अढळ स्थान मिळवायचे असेल, तर मुख्यमंत्री देशमुख यांनी आरक्षण द्यावे, असे आवाहन श्री. वरखिंडे यांनी केले.

maratha seva sangh, sambhaji brigade, jijau brigade, shivdharma

Sunday, November 9, 2008


बिकट अवस्थेमुळे मराठा समाजास आरक्षण मिळावे - ऍड. शशिकांत पवार
लातूर, ता. २० - मराठा समाज राज्याचे नेतृत्व करीत असला तरी तो मूठभर आहे. मराठा समाजातील अन्य बांधवांची अवस्था अत्यंत बिकट आहे.त्यामुळे समाजास आरक्षण मिळाले पाहिजे. ते मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे मत मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष ऍड. शशिकांत पवार यांनी सोमवारी (ता. २०) येथे व्यक्त केले.
अखिल भारतीय मराठा महासंघ व मराठा समन्वय समितीच्या वतीने सोमवारी मार्केट यार्डात झालेल्या मराठा आरक्षण परिषदेत ते बोलत होते. श्री. पवार म्हणाले, ""मराठा समाजास आरक्षण मिळावे, यासाठी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार गोपीनाथ मुंडे, महात्मा फुले समता परिषदेचे नेते छगन भुजबळ यांच्यासह अनेक नेत्यांचा पाठिंबा आहे. त्यामुळे मराठा समाजास आरक्षण देण्याबाबत राज्य शासनाने त्वरित निर्णय घ्यावा.
'' संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अनंत चोंदे यांनी विदर्भ व कोकणात कुणबी, तर मध्य महाराष्ट्रात मराठा समाज असून, ते दोन्ही एकच आहेत. त्यामुळे या समाजाचा इतर मागासवर्गीयांत समावेश करून त्वरित आरक्षण देण्याची मागणी केली. इतर मागासवर्गीयांचे १९ टक्के आरक्षण कायम ठेवून मराठा समाज आरक्षण मागत आहे. आजपर्यंत राज्यकर्त्यांनी मराठा समाजाचा वापर करून घेतला; पण आता असे होणार नाही, असे श्री. चोंदे म्हणाले. आरक्षणासाठी मराठा समाजावर शहीद होण्याची वेळ येऊ देऊ नका. हिवाळी अधिवेशनापूर्वी निर्णय घ्या, अन्यथा राज्यकर्त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशारा मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. तानाजी जाधव यांनी दिला. मराठा जातीऐवजी अन्य जातीचा मुख्यमंत्री असता तर, यापूर्वीच आरक्षण मिळाले असते, असे मत त्यांनी व्यक्त केले. या वेळी राजेंद्र कोंढारे, किशोर चव्हाण यांची भाषणे झाली. अखिल भारतीय मराठा महासंघाचे सरचिटणीस विनायक भोसले यांनी प्रास्ताविक केले. या परिषदेस मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष कामाजी पवार, सचिव खुशालराव जाधव, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष वैभव तळेकर, प्रदेश कोशाध्यक्ष उमाकांत उफाडे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा वनिता काळेंसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीमंत जाधव यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

मराठा समाजाला आरक्षण का हवे? - प्रवीण गायकवाड (कार्याध्यक्ष, संभाजी ब्रिगेड)

भारतीयांवर मनुवादी विचाराने व मनुस्मृतीच्या कायद्याने मोठा अन्याय केले आहे. मनुस्मृतीमुळे देशातला बहुसंख्य असलेला बहुजन समाज हक्क अधिकारापासून वंचित राहिला. ब्राह्माण, क्षत्रिय, वैश्य व शूद असे चार वर्ण परंतु कलियुगामध्ये ब्राह्माण व शूद हे दोनच वर्ण, यातील ब्राह्माण संपूर्ण अधिकार संपन्न व शूद हे अधिकार वंचित शूदांना सप्तबंदी लागू होती. यातील शिक्षण, संपत्ती, शस्त्र, रोटी, बेटी, तट व समुद उल्लंघन या सात बंदी यामुळे शूदवर्णाचे लोक अशिक्षित व दरिदी जीवन जगत होते. धर्मशास्त्राप्रमाणे शूद वर्णाच्या व्यक्तीने शिक्षण घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे डोळे काढावे, त्याची जीभ छाटावी व त्याच्या कानात शिसे ओतावे असा धर्म कायदा होता. सप्त बंदी कायद्याचा आधार घेत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यास नकार दिला. संत तुकाराम महाराजांची गाथा बुडविली. छत्रपती शाहू महाराज व सयाजीराव गायकवाड यांचे वेदोक्त प्रकरण गाजले आहे. मराठा समाज हा हक्क अधिकारापासून वंचित होता. म्हणजेच तो शूद्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य कार्याने ख-या अर्थाने नवीन युगाला सुरुवात झाली. त्याची प्रेरणा घेऊन ब्रिटीश राजवटीमध्ये महात्मा जोतिराव फुले यांनी शूद समाजाला प्रबोधित करून आपल्या हक्कासाठी लढण्यास उद्युक्त केले. महात्मा जोतिबा फुले यांनी ब्रिटिशांकडे शूदवर्णाच्या अशिक्षित गोरगरीब समाजाला शिक्षण व विशेष सवलती देण्याची प्रथम मागणी केली. 'गुलामगिरी' या आपल्या ग्रंथामध्ये त्यांनी शूद व अतिशूद समाजाची म्हणजेच शेती व शेतीवर उपजीविका करणाऱ्या लोकांची व्यथा मांडली आहे. शूद वर्ण म्हणजेच मराठा व आजचा इतर मागासवर्ग. अतिशूद म्हणजे अस्पृश्य व आदिवासी समाज, ज्याला आज आपण अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती म्हणतो. महात्मा फुले यांनी शूद अतिशूदांसाठी मोठा सामाजिक लढा उभा केला. हे कार्य पुढे छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या करवीर संस्थानामध्ये चालू केले. त्यांनी मोफत शिक्षण, मुलांसाठी सर्व जातींचे वसतीगृह व बहुजन समाजाला शिक्षण घेण्याची प्रेरणा मिळावी म्हणून आपल्या राज्यामध्ये ५० टक्के आरक्षणाची व्यवस्था केली. त्यांनी ब्राह्माण, शेणवी, कायस्थ, पारशी वगळता उर्वरित मराठा बहुजन समाज हा शूदवर्णाचा असून शेतीवर उपजीविका करणारा अडाणी वर्ग आहे म्हणून त्यांना आरक्षण घोषित केले. छत्रपती शाहूमहाराजांच्या या कार्याचे प्रतिबिंब म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत आरक्षणाची तरतूद केली. त्यांनी अतिशूद वर्णाच्या लोकांना आरक्षणाची व्यवस्था केली. १५ टक्के अनुसूचित जाती, साडेसात टक्के अनुसूचित जमातीसाठी ३४१ व ३४२ कलम टाकले व इतर मागासवगीर्यांसाठी ३४० कलमानुसार आयोग नेमण्याची व्यवस्था केली. ३४० व्या कलामानुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या इतर मागासवगीर्यांच्या जाती निश्चित कराण्यास व आरक्षणाचा लाभ देण्यास भारत सरकारने चाल-ढकल केल्याने बाबासाहेब आंबेडकरांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला व इतर मागासवगीर्यांच्या हक्क अधिकारासाठी लढा दिला. भारतातील पहिला इतर मागासवगीर्यांसाठीचा आयोग म्हणजे १९५३ चा खा. काका कालेलकर आयोग. या आयोगाचे काम इतर मागासवगीर्यांच्या जाती निश्चित करणे व त्यांच्या उन्नतीसाठी सूचना करणे हे होते. या आयोगापूवीर् ब्रिटीश राजवटीमध्ये आठ आयोग जाती निश्चिती करण्यासाठी झाले होते. त्यांनी काढलेले निष्कर्ष हा होता की १. शूद वर्णाचे लोक, २ ब्राम्हणेतर लोक. ३ शेती करणारे व शेतीवर उपजिविका करणारे म्हणजे इतर मागासवगीर्य लोक या आधारे व एकूण भारत देशाचा अभ्यास करून कालेलकरांनी २३९९ जाती निेश्चित केल्या. यामध्ये मराठा समाजाचा मराठा म्हणून समावेश केला आहे. परंतु हा अहवाल लागू करण्यात आला नाही. पुढे १९७७ मध्ये मंडल आयोगाची स्थापना करण्यात आली. या आयोगाने ३७४३ जाती निेश्चत केल्या. १३४४ जाती वाढवल्या. पण शूदवर्णाच्या व शेतीवर उपजीविका करणाऱ्या मराठा समाजाला वगळले, याची त्यांनी कुठलीही कारणे दिली नाहीत. हा सरळ सरळ मराठा समाजावर अन्याय झाला आहे. मात्र देशभरामध्ये मराठा समाजासारखे जीवन जगणारे जाट, कुमीर्, अहिर, यादव, रेड्डी, गौडा, नायर व महंतो यांचा समावेश केला आहे. महाराष्ट्रात माळी, धनगर, वंजारी, तेली हेही सामाविष्ट झाले आहेत. १९९० मध्ये मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्याची घोषणा झाली. त्याला सवोर्च्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्यामुळे १९९५ पर्यंत मंडल आयोगाची अंमलबजावणी सुरू झाली नाही. इंदिरा साहानी विरुद्ध भारत सरकार या याचिकेमध्ये मागणी केली नसताना सवोर्च्च न्यायालयाने एक अन्यायकारक निर्णय देऊन ५० टक्केची मर्यादा घातली. केंद सरकारने नेमलेल्या खासदार नचिपन कमिटीने मात्र ही मर्यादा घटनाबाह्य असून ती रद्द करावी अशी शिफारस केंद सरकारकडे केली आहे. केरळमध्ये ७२ टक्के, कर्नाटकमध्ये ६९ टक्के, आंध्रात ६५ टक्के, राजस्थानात ६५ टक्के, महाराष्ट्रानेसुद्धा ५२ टक्के मर्यादा ओलांडली आहे. आता ५२ टक्के ओ. बी. सीं. ना ५२ टक्के आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे. जो महाराष्ट्रात फक्त १९ टक्के मिळत आहे. हा ओबीसींवर अन्याय आहे सध्या फक्त पहिल्या टप्प्यातील नोकरीचा लाभ मिळत आहे. पण पदोन्नती, शिक्षण व राजकारणातला लाभ मिळत नाही. यावर मराठा व इतर मागासवगीर्य समाजाने एकत्र येऊन लढा देणे गरजेचे आहे. मराठा समाज ही जात नसून हा एक समूह आहे. आजच्या मराठ्यांची जात ही कुणबी आहे, हे अनेक वेळा ऐतिहासिक पुराव्यावरून सिद्ध करता येते. देशाच्या राष्ट्रगीतात मराठा हा शब्द येतो. भारतीय सैन्यामध्ये मराठा बटालियन आहे. 'मराठा मेला तर राष्ट्रही मेले. 'मराठा विना राष्ट्र गाडा न चाले' असे म्हटले जाते. महाराष्ट्रात राहणारा तो मराठा. मराठी बोलणारा तो मराठा म्हटले जाते. शिवाजी महाराजांच्या सैन्यातील बारा बलुतेदार मावळ्यांना मराठा संबोधले जात होते. यावरून स्पष्ट होते की मराठा ही जात नसून प्रदेशवाचक शब्द आहे. महात्मा फुले हे शिवाजी महाराजांना कुळवाडी भूषण म्हणजे कुणब्यांचा राजा असे म्हणतात. १८८१ च्या जनगणेमध्ये मराठा व कुणबी या भिन्न जाती नसून एकच आहे. नंतर बॉम्बे गॅझेटियरप्रमाणे मराठा व कुणब्यांमध्ये भेदाभेद नाही. मराठा कुणीबीचे विवाह न्यायालयाने वैध ठरवले. गॅझेटियर ऑफ इंडियानुसार मराठा-कुणबी यांच्यात फरक नाही. शेती करणारा मराठा म्हणजे कुणबी. मराठा कुणबी समाजाचे लग्नविधी, कुलदैवत, परंपरा, सण, उत्सव एकच आहेत. १ जून २००४ रोजी महाराष्ट्र सरकारच्या त्नक्र ८३ व्या दुरुस्तीप्रमाणे मराठा कुणबी व कुणबी मराठा यांना आरक्षणाचा लाभ मिळावा असे म्हटले आहे. वरील निर्णयावरून महाराष्ट्र सरकारला मराठा कुणबी एकच असल्याचे मान्य होते. कुणबी समाजाला आरक्षणाचा लाभ मिळतो. मात्र शूद वर्णाच्या शेतीवर उपजीविका करणाऱ्या मराठा समाजाला मात्र मिळत नाही. फुले, शाहू, आंबेडकरांच्या समाजातील मोठा घटक असणाऱ्या मराठा समाजावर हा अन्याय आहे. आज मराठा समाजातील ८० टक्के तरुण हे दहावीनंतर शिक्षण सोडून देतात. कारण त्यांची आथिर्क परिस्थिती नसते व ग्रामीण शाळेमध्ये शिकल्यामुळे भाषेचा प्रश्ान् उद्भवतो. हा एक न्यूनगंड आहे. एकूण मराठा समाजातील ८२ टक्के लोक शेतीवर उपजीविका करत असतात. मुख्यत: निसर्गावर अवलंबून आहे. यातील ७० टक्के शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. जिराईत शेतीचे मालक आहेत. म्हणून दारिद्य रेषेखाली जीवन जगत असतात. आत्महत्या करणाऱ्या ३७०० पैकी ३२४६ हे मराठा कुणबी समाजातील आहेत. कर्जबाजारीपणाने व्यथित आहे. आथिर्क दुर्बलतेमुळे सामाजिक स्तरही खालावला आहे. मागासवगीर्यांची व्याख्या करताना ज्या समाजाचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त लोक आथिर्क दुर्बल आहेत व शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत त्यांना मागासवगीर्य समजावेत. आज महाराष्ट्रात मराठा समाजातील ८० टक्के समाज अशिक्षित आहे व ७० टक्के दारिद्य रेषेखाली जीवन जगत आहे. म्हणून तो मागासवगीर्य आहे व आरक्षणाचा लाभ घेण्यास पात्र आहे. आज मराठा समाज रोजगार हमी योजना, माथाडी कामगार, हमाली करणे अशा निकृष्ट दर्जाचे काम करून उपजीविका करत आहे. समाजाची संख्या मोठी असल्याने समस्याही खूप मोठ्या आहेत. सहकार चळवळ हे महाराष्ट्राला मराठा समाजाचे योगदान आहे. परंतु सरकारी धोरणामुळे सहकार चळवळ मोडकळीस आली आहे. राज्यकतेर् मराठा असल्यामुळे आपण मराठा समाजाच्या हिताचा निर्णय घेतल्यास आपण जातीवादी ठरू अशी भीती बाळगतात. आजपर्यंत मराठा समाजाने स्वत:साठी ही पहिलीच मागणी केली आहे. मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळाल्याने गेली अनेक वषेर् धुमसत असलेला आरक्षण समर्थक व आरक्षण विरोधक हा वाद संपुष्टात येईल व सामाजिक ऐक्य घडेल. छत्रपती शाहू महाराजांनी संपूर्ण बहुजन समाजाला आरक्षणाचा लाभ दिला. आज शाहूंचा मराठा आरक्षणाची मागणी करतो तर त्याला आरक्षणाचे लाभधारक विरोध करतात. याचा खेद वाटतो. म्हणून धर्मवादी जातीव्यवस्था गाडण्यासाठी समता, बंधुता, न्याय प्रस्थापित करण्यासाठी मराठा समाजाला आरक्षण देऊन राज्यर्कत्यांनी मनुवादाकडून मानवतावादाचा प्रवास पूर्ण करावा.

(from- maharashtra times,marathi katta , jijausandesh)



समाजाला सर्व क्षेत्रांत आरक्षण हवे - आमदार विनायक मेटे

नंदुरबार, ता. २५ - मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. लोकसभा निवडणुकीपूर्वी हे आरक्षण देण्यात यावे. त्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही.आरक्षण मिळविण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या आंदोलनाला सामोरे जाण्याची तयारी समाजाने ठेवावी, असे आवाहन समन्वय समितीचे प्रमुख, आमदार विनायक मेटे यांनी आज येथे केले. सामाजिक आरक्षणाच्या मुख्य मागणीबाबत जनजागृती करण्यासाठी आज येथे मराठा आरक्षण परिषद झाली, त्या वेळी श्री. मेटे बोलत होते. भारतीय मराठा महासंघाचे नेते किसनराव वरखिंडे, महाराष्ट्रीय मराठा महासंघाचे अंकुशराव पाटील, छावा मराठा युवा संघटनेचे प्रा. देविदास वडजे आदी प्रमुख पाहुणे होते. श्री. मेटे म्हणाले, की इतिहासाचे अवलोकन केले, तर समाज राज्यकर्ता, वतनदार, जमीनदार असल्याचे निदर्शनास येते. मात्र त्यात आता बदल झाला आहे. सद्यःस्थितीत मराठा समाजात गरिबांची संख्या अधिक आहे. नोकरीसाठी उच्च शिक्षणाची गरज आहे. मात्र शिक्षणासाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने समाजाला विविध अडचणींना तोंड द्यावे लागते. अलीकडच्या काळात मराठा समाजातील अनेक जण हमाली करीत आहेत. हमालांच्या पोरांना चांगले दिवस यावेत यासाठी हा लढा देण्याची गरज आहे. मोर्चा तसेच अन्य आंदोलनांच्या माध्यमातून आरक्षणासाठी लढा दिला जाईल. त्याबाबत जनजागृती करण्यासाठी हा मेळावा घेण्यात आला आहे. मराठा समाज शेती आणि राजकारण करण्यात पुढे आहे. शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या झाल्या त्यात ७० टक्‍के मराठा समाजाचे शेतकरी होते. त्यांना कुठलीही शासकीय सवलत नसल्याने ते मागे राहिले. आरक्षण नसल्याने पुढच्या पिढीचे नुकसान होत आहे. हक्‍कांसाठी भांडणे हे आपले कर्तव्य आहे. नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामपंचायत ते लोकसभा या सर्व जागा राखीव आहेत, आरक्षित आहेत. त्यासाठी मराठा समाजातील कोणीही आवाज उठवला नाही, याची आपणास खंत वाटते, असे श्री. मेटे म्हणाले. आरक्षणाच्या मुद्यावर पंचायत समितीचे सभापती विक्रम वळवी न्यायालयात गेले आहेत. मात्र मराठा समाजातील एकाही माणसाला याबाबत याचिका दाखल करावी, असे वाटले नाही, असे असताना, कोणतीही सवलत मिळत नसताना आपल्या समाजातील लोक नेत्यांना डोक्‍यावर घेतात कसे, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. मराठा समाजाला आरक्षण ही राजकारणविरहित मागणी आहे. शासनावर दबाव आणण्यासाठी एकाच व्यासपीठावर मराठा समाजातील विविध संघटना एकत्र आल्या आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, मराठा समाजाचा सरसकट ओबीसी प्रवर्गात समावेश करावा, मराठा समाजाला सर्व क्षेत्रांत २५ टक्‍के आरक्षण लागू करावे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम त्वरित सुरू करावे, आदी मागण्यांवर भर देण्यात येत आहे. यासाठी प्रसंगानुरूप गरज पडेल ते आंदोलन करण्यात येईल. त्यासाठी समाजातील सर्व घटकांनी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन श्री. मेटे यांनी केले. देविदास वडजे, रवींद्र देशमुख, विश्‍वास मराठे, डॉ. विजया गायकवाड, किसनराव वरखिंडे, अंकुशराव पाटील, लक्ष्मण कदम, रवींद्र मराठे आदींनी मनोगत व्यक्‍त केले. यात समाजाला संघटित होण्याचे आवाहन करण्यात आले. परिषदेला माजी नगरसेवक श्‍याम मराठे, पालिकेचे शिक्षण सभापती दीपक दिघे, पंडितराव पवार, रामदास गायकवाड, प्रमोद बोडखे, सतीश मराठे, वकील पाटील आदी उपस्थित होते.

देता का जाता?

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी रायगड, परभणी, ठाणे, लातूर, नाशिक, सातारा, नागपूर येथे आरक्षण परिषद झाली आहे. दिवाळीनंतर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांत परिषद घेतली जाईल. २३ नोव्हेंबरला नागपूरला इशारा मेळावा होणार आहे. एक डिसेंबरला पुढच्या आंदोलनाची दिशा स्पष्ट होईल. त्या वेळी "देता का जाता' आंदोलन केले जाईल.

आरक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवा

हिंगोली, ता. १९ - मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणासाठी सर्वच संघटनांनी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन मराठा आरक्षण परिषदेत उपस्थित मान्यवरांनी रविवारी (ता.१९) केले.येथील मराठा महासंघ समन्वय समितीतर्फे महावीर भवनात मराठा आरक्षण परिषद घेण्यात आली. शिवधर्म समन्वयक नेताजी गोरे यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. आमदार सुभाष वानखेडे अध्यक्षस्थानी तर आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश सचिव मनोज आखरे, छावा मराठा युवा संघटनेचे किशोर चव्हाण, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष खंडेराव सरनाईक, मराठा महासंघाचे विभागीय अध्यक्ष आनंद अडकिणे, ऍड. केशवराव शिरसाट, डॉ. संतोष बोंढारे, तानाजी भोसले, जिल्हा परिषद सदस्य श्‍यामराव जगताप, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष त्र्यंबकराव लोंढे, डॉ. प्रल्हाद शिंदे बाजार समितीचे उपसभापती रामेश्‍वर शिंदे पाटील, माजी उपसभापती उत्तमराव जगताप, चंद्रकांत घ्यार, व्यंकटराव जाधव, एम. व्ही. मोरे, अशोक अडकिणे, गजानन भालेराव, प्रा. अमृत जाधव यांच्यासह मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. तसेच मराठा महासंघ, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, छावा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष त्र्यंबकराव लोंढे यांनी प्रास्ताविक केले. या वेळी श्री. गोरे म्हणाले की, जिल्हा परिषद, नगर पालिका, ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सेवा संस्था व संघटनांनी मराठा आरक्षणाचे ठराव शासनाकडे पाठवावेत. सर्व संघटनांनी समन्वय साधून आरक्षणासाठी निकराचा लढा देण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रा. डॉ. नामदेव दळवी, डॉ. प्रल्हाद शिंदे यांनी सूत्रसंचालन तर आनंद अडकिणे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी गुलाबराव लोंढे, राजेश्‍वर भालेराव, डॉ. सुभाषराव लोंढे, बंडू अडकिणे, गणपत शिंदे, नंदकुमार लोंढे, पप्पू गलबले, रामेश्‍वर शिंदे, पांडूरंग चौतमल, बापूराव पवार, बबनराव लोंढे, भागवत मानकरी, डी.डी. पाटील आदींनी पुढाकार घेतला.

मराठा आरक्षणात तडजोड नाही - विनायक मेटे

कऱ्हाड, ता. २० - "मराठा आरक्षणासाठी शासनावर दबाव टाकला जाईल. त्यासाठी कोणतीही तडजोड होणार नाही. आरक्षणाच्या मागणीसाठी आग्रही असून, राज्यातील लोकप्रतिनिधी व लोकनियुक्त संस्थांनी त्याबाबतचे ठराव १७ नोव्हेंबरपूर्वी द्यावेत, असे आवाहन मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष व "शिवसंग्राम'चे संस्थापक आमदार विनायक मेटे यांनी आज येथे केले. येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनात आज झालेल्या मराठा आरक्षण परिषदेत ते बोलत होते. या वेळी राज्य समन्वय समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. आमदार मेटे म्हणाले, ""येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. ते न मिळाल्यास राज्यातील मराठा समाज वेळप्रसंगी शासनाच्या विरोधात भूमिका घेईल. आरक्षण प्रश्‍न लढ्यानेच सोडवावा लागेल. मराठा समाजाला इतर मागासवर्गीयांत समाविष्ट करायचे आहे. त्यामुळे सध्या असलेले या समाजाचे १९ टक्के आरक्षण नव्याने २५ टक्के सर्वच क्षेत्रात मिळावे, अशी मागणी आहे. त्यासाठी शासनावर दबाव टाकला जाईल. मराठा समाजाची मोठी बिकट अवस्था आहे. त्यामुळे या समाजाची वाताहत होत आहे. सत्तेत मराठा समाजाचे आमदार मोठ्या संख्येने असले, तरी त्यांनी या समाजाच्या प्रश्‍नांकडे सातत्याने दुर्लक्षच केले आहे. आरक्षण मिळविण्यासाठी समाज रस्त्यावर उतरेल.'' मराठा विकास संघटनेचे सुरेश पाटील म्हणाले, ""मराठा समाजाने संघटितरीत्या चळवळ उभारून लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी आरक्षणप्रश्‍नी निर्णय न झाल्यास बहिष्काराचा मार्ग अवलंबावा.'' या वेळी सैदापूरचे उपसरपंच मोहन जाधव, तानाजीराव शिंदे, महाराष्ट्र मराठा महासंघाचे अंकुश पाटील, छावा संघटनेचे संस्थापक देविदास कडणे आदींनी मार्गदर्शन केले. सुरवातीला ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील, सौ. आशादेवी विलासराव पाटील- उंडाळकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. जिल्हाध्यक्ष अजित बानुगडे यांनी प्रास्ताविक केले.

"आचारसंहितेपूर्वी मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे'

पुणे, ता. २३ - कोणत्याही परिस्थितीत लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे; अन्यथा गुज्जर समाजाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा शिवसंग्रामचे संस्थापक विनायक मेटे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला.मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी विविध स्तरांवर आंदोलन सुरू आहे. मराठा समाजाचा इतर मागासवर्गात समावेश करावा आणि इतर मागासवर्गाच्या आरक्षणात २५ टक्‍क्‍यांनी वाढ करावी, अशी मागणी त्यांनी केली. यासंदर्भात सरकारने सकारात्मक भूमिका घेतली असली, तरी सर्व समाजाने दबाव आणल्याशिवाय आरक्षण मिळेल, असे सांगता येत नाही, त्यामुळे अन्य समाजाच्या नेत्यांशीही भेटीगाठी सुरू असून, जवळपास सर्व पक्षांनीही याला संमती दिल्याचे मेटे यांनी सांगितले. इतर समाजाचे नेते गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ यांनी आपापल्या समाजाचाही विचार केला; मात्र शरद पवार, विलासराव देशमुख आदी नेत्यांनी संपूर्ण समाजाचा विचार केला, त्यामुळे याबाबत कोणालाही दोष देता येणार नाही, असे ते म्हणाले. राजकीय आरक्षणही हवेच "मराठा समाजास राजकीय आरक्षण नको,' अशी भूमिका विविध संघटनांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या मराठा आरक्षण समितीने घेतली आहे. त्यासंदर्भात विचारले असता मेटे म्हणाले, ""मराठा समाजास सरसकट निवडणुकांसह सर्व क्षेत्रांत आरक्षण मिळाले पाहिजे, अशी शिवसंग्रामची भूमिका आहे. ज्यांना नको आहे, त्यांनी राजकीय आरक्षण घेऊ नये.''


...तर तुमचा विचार आम्ही करू - मेटे

बुलडाणा, ता. ८ - ""मराठा समाजाने सर्व पक्षांना सत्ता दिली. अनेक जणांना सत्तेत नेऊन मोठे केले. आता मराठा समाजाचा विचार तुम्ही करा व आमच्या आरक्षण लढ्याला पाठिंबा द्या. निवडणुकांच्या आचारसंहितेपूर्वी आरक्षणाची घोषणा करा, अन्यथा आम्हीसुद्धा आचारसंहिता संपल्यावर तुमचा विचार करू,'' असा इशारा शिवसंग्रामचे अध्यक्ष माजी आमदार विनायक मेटे यांनी आज (ता. ८) येथे दिला. मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी स्थानिक गर्दे सभागृहात आरक्षण परिषद घेण्यात आली. यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष किसनराव वरखिंडे, छावाचे देविदास वडजे, मनोज पाटील, संजय गायकवाड, डॉ. डी. जे. खेडेकर, गुलाबराव खेडेकर, प्रसेनजित पाटील, टी. डी. अंभोरे यांच्यासह इतर मराठा समाजाचे विविध पक्षांतील मान्यवर उपस्थित होते. मराठा संघटित झाले तर जातिवादाचा वास येऊ लागला, अशी टीका केली जाते; परंतु इतर जेव्हा एकत्र येतात त्यावेळी समाजक्रातीच्या गप्पा कशा मारल्या जातात, असा प्रतिप्रश्‍न मेटे यांनी उपस्थित केला. निसर्गाची अवकृपा आणि शासनाच्या दुर्लक्षामुळे आमचा समाज आत्महत्येच्या मार्गाला लागला आहे. पोटाची खळगी भरण्याची विवंचना असणाऱ्या, दारिद्य्रात पिचलेल्या समाजासाठी आपण आरक्षण मागतो आहोत. राजकारण हे आपले उद्दिष्ट नाही, असे सांगून मेटे यांनी या परिषदेला गैरहजर राहणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यातील मराठा नेत्यांवर टीकाही केली. समाजाच्या भरोशावर मोठे झालेल्यांना जाब विचारण्याची वेळ आल्याचे सांगून समाजासाठी काम करणाऱ्यांचीच समाज आठवण ठेवतो. आमदार, नामदारांना समाज विसरतो, असे सांगितले. इतरांना जे आरक्षण दिले ते कायम ठेवा, गरज असेल तर त्यांना वाढवून द्या; मात्र आम्हाला आरक्षण द्या. अन्यथा या मार्गात येणाऱ्यांची खैर नाही, असा इशारा मेटेंनी दिला. आरक्षणाच्या मागणीसाठी पुढील काळात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. देविदास वडजे म्हणाले की, मुंडे, भुजबळ जर समाजासाठी अहोरात्र काम करतात तर मराठा समाजाचे नेते काय करीत आहेत. सत्ताधारी लोक म्हणजे समाज नाही. तसेच या लढ्याचे निवडणुका हे उद्दिष्ट नाही, असे त्यांनी शेवटी स्पष्ट केले. अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष किसनराव वरखिंडे यांनी समाजाच्या आजच्या अवस्थेस कारणीभूत ठरलेल्या बाबींचा उहापोह करताना आरक्षण किती आवश्‍यक आहे, हे पटवून सांगितले. अण्णासाहेब पाटलांनी "मराठा' शब्दाविषयी बाळगलेला बाणा आजच्या नेत्यांनी जोपासला पाहिजे, असे सांगून विनायक मेटे हे समाजासाठी काम करीत अण्णासाहेबाचे कार्य पुढे नेत आहेत. त्यांच्या या लढ्याला सर्वच पक्षांतील नेत्यांनी पाठबळ द्यावे, असे आवाहन केले. टी. डी. अंभोरे पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तत्पूर्वी संजय गायकवाड यांनी प्रास्ताविकात परिषदेची भूमिका मांडली. पाठबळ द्या परिषदेला उपस्थित मराठा समाजातील दुसऱ्या फळीतील नेत्यांनीही आपले विचार मांडून हा लढा अधिक तीव्र करतानाच मेटेंच्या पाठिशी उभे राहण्याचे आश्‍वासन दिले. यावेळी जिल्ह्याभरातून मराठा समाजाचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

मराठा समाजासाठी आरक्षण मिळवणारच - विनायक मेटे

परभणी, ता. २८ - मराठा समाजास आरक्षण देण्याचा मुद्दा सरकारदरबारी जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात येत आहे. आता आरक्षण मिळविण्यासाठी मराठा समाज, विविध मराठा संघटना एकत्र आल्या आहेत.त्यामुळे आपण कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजास सरसकट आरक्षण मिळवून देऊ, असा निर्धार माजी आमदार तथा "शिवसंग्राम'चे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी रविवारी (ता.२८) येथे व्यक्त केला. मराठा समन्वय समितीतर्फे आयोजित मराठा आरक्षण जागृती परिषदेत ते बोलत होते. कल्याण मंडपम सभागृहात ही परिषद झाली. व्यासपीठावर जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा जयश्री शेळके, छावा संघटनेचे प्रा. देविदास वडजे, महाराष्ट्रीयन मराठा संघटनेचे अंकुश पाटील, "गृहवित्त'चे अध्यक्ष संतोष बोबडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजयराव वरपूडकर, किशनराव वरखिंडे, सुरेश माने, राजेंद्र कोंडारे, बाळासाहेब मोहिते, धाराजी भुसारे यांच्यासह विविध मराठा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. श्री. मेटे म्हणाले,""पिढ्यान्‌पिढ्या मराठा समाज शेती व्यवसाय करत आला आहे. समाजातील कोणत्याही नेत्यांनी व लोकप्रतिनिधींनी समाजाच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. समाजातील बोटावर मोजण्याएवढ्याच लोकांकडे शेकडो एकर जमिनी व संपत्ती आहे. ९० टक्के समाज आर्थिक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ही पदे आणि जिल्हा परिषदा, पंचायत समित्या समाजाच्या लोकप्रतिनिधींच्या ताब्यात असूनही आपल्या जातीसाठी कोणत्याही नेत्याने ठोस भूमिका घेतलेली नाही. समाजाची शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पीछेहाट झालेली आहे. प्रशासकीय क्षेत्रात समाजाचा एखाददुसरा अधिकारी आहे. समाजाची आरक्षणाच्या माध्यमातून प्रगती होणार आहे. त्यासाठीच सर्व संघटना एकत्र आल्या आहेत.'' ""आता ता. ११ ऑक्‍टोबरला ठाणे, ता. १७ व १८ ऑक्‍टोबरला नाशिक येथे आरक्षण जागृती परिषद होणार आहे. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात राज्यातील सर्व जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी कार्यालयांवर आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चे काढण्यात येतील. जानेवारी २००९ मध्ये मुंबई येथे आरक्षणासाठी "देता की जाता?' मोर्चा काढण्यात येणार आहे,'' अशी माहितीही श्री. मेटे यांनी दिली. जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा जयश्री शेळके म्हणाल्या, ""एकीकरणामुळे शासनावर दबाव निर्माण होत असून काही महिन्यांत निश्‍चितच आरक्षण मिळेल. त्यासाठी महिलांनीही आंदोलनात सहभागी व्हावे.'' विजय वरपूडकर म्हणाले, ""राजस्थानात गुज्जर समाजाने आरक्षणासाठी एकजुटीने लढा दिला तसा लढा द्यावा. सामाजिक बांधिलकी म्हणून सर्व पक्षांतील मराठा समाजातील लोकप्रतिनिधींनी एकत्र यावे. आरक्षणासाठी शेवटपर्यंत लढ्यात राहणार असून वेळ पडल्यास पक्षाचा राजीनामा देऊ.'' या वेळी मराठा एकत्रीकरण समितीच्या अध्यक्षपदी श्री. मेटे यांची निवड करण्यात आली. बब्रूवाहन शेंडगे यांनी प्रास्ताविक केले. विठ्ठल भुसारे यांनी सूत्रसंचालन केले. किशनराव वरखिंडे यांनी आभार मानले. परिषदेसाठी डॉ. विलास मोरे, डॉ. शंकरराव देशमुख, का. स. शिंदे, रणजित कारेगावकर, गजानन जोगदंड, भानुदास शिंदे, माणिकराव मोहिते, ऍड. विष्णू नवले, बाळासाहेब यादव, अशोक सालगुडे, श्रीनिवास जोगदंड, सखाराम गायकवाड, दत्ता बुलंगे, रुक्‍मिणी जाधव, विठ्ठल तळेकर, प्रमोद टोंग, भाऊसाहेब गिराम, डॉ. बालासाहेब लंगोटे, माणिकराव मोहिते यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. परिषदेस मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव उपस्थित होते.



मराठा आरक्षणासाठी हुतात्मा होण्यास तयार - विनायक मेटे

ठाणे, ता. ११ - मराठा समाजाच्या हितासाठी काढण्यात आलेल्या लाखोंच्या मोर्चानंतर बाबासाहेब भोसले या मराठा मुख्यमंत्र्यांनीच त्याची दखल न घेतल्याने अण्णासाहेब पाटील यांना हुतात्मा व्हावे लागले.आजच्या घडीला मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नाला तडीला नेण्यासाठी पुन्हा एकदा हुतात्मा होण्याची वेळ आली आहे. समाजासाठी दुसरा हुतात्मा होण्याची माझी तयारी असून या प्रश्‍नावर आक्रमक आंदोलन करण्यासाठी अशा हुतात्म्यांची साखळी होणे आवश्‍यक असल्याचे मत मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी व्यक्त केले. राम गणेश गडकरी रंगायतन येथे मराठा समाजाला आरक्षण मिळविण्याच्या मागणीसाठी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी किसनराव वरखिंडे, सुरेश माने, देवदास वडजे, अकुंशराव पाटील, प्रभाकर सावंत, किरण चव्हाण आदी उपस्थित होते. मराठा समाजाचे लोक आमदार, खासदार पदावर बसल्याची पोटदुखी अनेकांना आहे, पण हे सत्ताधारी म्हणजे संपूर्ण समाज नसून तो फक्त पाण्यावरील तवंग आहे. या तवंगाच्या खाली गरिबीने पिचलेला समाज उरला आहे, पण या समाजाला बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा नेता न मिळाल्याने कायम अन्यायाला सामोरे जावे लागले. मराठा हा जातीवाचक नाही, तर गुणवाचक शब्द आहे. लढण्यासाठी गेले ते मऱ्हाटा, तर शेतीसाठी राबणारे कुणबी म्हणून ओळखले जाऊ लागले. शिवरायांच्या काळात अगदी एका घरात एक भाऊ मऱ्हाटा आणि एक कुणबी असे. रामदास स्वामींनीही मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, ही शिकवण एका समजाला नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला उद्देशून दिली होती. असे असतानाही मराठा समाजावर सातत्याने अन्याय केला गेला. या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी आरक्षण न मिळाल्यास गुज्जर आंदोलनाप्रमाणे मराठा समाजातील लोकांनी रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. डिसेंबर महिन्यात चलो मुंबईचा नारा देऊन "देता का जाता' ही घोषणा दिली जाणार असल्याचे विनायक मेटे यांनी सांगितले. त्यापूर्वी जिल्हा स्तरावर सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Monday, June 2, 2008

१६ ऑक्टोबर पासून राज्यभर आंदोलन -अनंत चोंदे
शिर्डी- गेल्या १८ वर्षा पासून मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही,औरंगाबाद येथे १७ सप्टेबरला झालेल्या मंत्रिमंडलाच्या बैठकित दिलेली मुदत येत्या १६ तारखेला संपत आहे. मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसात निर्णय न घेतल्यास् राज्यभरात जोरदार आंदोलन छेडले जाइल,असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अनंत चोंदे यांनी दिला आहे,दरम्यान मराठा समन्वय समिति तर्फे २ नोव्हेबर पासून आंदोलन सुरु केले जाणार आहे. पहा -http://www.pudhari.com/AhemadNagarGraminDetailNews.aspx?news_id=82464
maratha samanway samiti will take out a huge morcha on maharashtra state cabinet meeting !!!!
Aurangabad:-on the occasion of marathwada muktisangram din (17th sept 2008) maharashtra cabinet has called a two day meeting at aurangabad.
samiti will take out a huge morcha on cabinet meeting on 17th september 2008.this samiti consists of near about 12 to 13 sanghatana and various political parties.










मराठा-ओबीसी आरक्षण प्रश्न पेटला ......मराठा समाजाच्या आरक्षणासाठी संघटनांची आता समन्वय समिती

औरंगाबाद, ता. २३ - मराठा समाजाचा इतर मागासवर्गीयांत समावेश करावा, या मागणीसाठी समाजातील संघटनांनी एकत्र येऊन मराठा समन्वय समितीची स्थापना केली असून शासनाने आरक्षण न दिल्यास राजस्थानातील गुर्जर समाजाच्या आंदोलनाप्रमाणे तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा समन्वय समितीच्या सदस्यांनी आज (ता. २३) येथे पत्रकार परिषदेत दिला.
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी अनेक संघटना लढा देत होत्या. मात्र, संघटनांमध्ये आरक्षणाचे स्वरूप व इतर काही मुद्यांवरून मतभेद होते, त्यामुळे लढ्याला यश येत नव्हते. १९ ऑगस्ट रोजी पुणे येथे झालेल्या बैठकीत आरक्षणावर चर्चा होऊन समाजाचा इतर मागासवर्गीयांत समावेश करण्याची मागणी रेटून धरण्याचा निर्णय घेण्यात आला. मागणीसाठी मराठा समन्वय समितीच्या झेंड्याखाली एकत्रित लढण्याचे ठरले. बैठकीस मराठा महासंघ, मराठा सेवा संघ, शिवसंग्राम संघटना, अखिल भारतीय छावा, अखिल भारतीय मराठा सेवा संघ, बुलंद छावा, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्रीय मराठा महासंघासह विविघ संघटनांचे १०० मुख्य पदाधिकारी उपस्थित होते. आंदोलनापूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचे ठरले असून, ही जबाबदारी समितीने विनायक मेटे यांच्यावर सोपविली आहे. सर्वप्रथम समिती लोकशाही मार्गाचा अवलंब करीत मंगळवारी (ता. दोन) क्रांती चौक येथे रास्ता रोको आंदोलन करणार आहे. त्यानंतर १८ सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळ बैठकीवर मोर्चा काढण्यात येणार आहे. आरक्षणाचा निर्णय निवडणुकीपूर्वी व्हावा, अशी समितीची भूमिका आहे. निर्णय न झाल्यास समितीचे आंदोलन समाजाच्या हाती जाईल व त्यानंतर राज्यामध्ये राजस्थानाच्या गुर्जर आंदोलनाची पुनरावृत्ती होण्याची शक्‍यता आहे. राज्य मागासवर्गाने पाठविलेला अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करावा, ऍट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करावी व अरबी समुद्रातील नियोजित शिवस्मारकाचे जलपूजन तातडीने करून त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. या पत्रकार परिषदेला प्रा. देवीदास वडजे, किशोर चव्हाण, मिलिंद पाटील, चंद्रकांत भराट, प्रदीप सोळुंके, मनोज पाटील, विष्णू वाकडे, सोमनाथ पवार, सुरेश वाकडे, संजय तायडे आदींची उपस्थिती होती.




यापुढे गनिमी काव्याने लढा - प्रवीण गायकवाड
सातारा, ता. ६ - संपूर्ण राज्यात मराठा समाजाला कुणबी मराठा म्हणून दाखले मिळत आहेत. केवळ पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात दाखले दिले जात नाहीत. ही दुर्दैवाची बाब असून, शासनाचे याची दखल न घेतल्यास संभाजी ब्रिगेड गनिमी काव्याने शासनाविरोधात लढा देईल, असा इशारा ब्रिगेडचे कार्याध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी दिला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आंदोलनाची दिशा व स्वरूप ठरविण्यासाठी येथील अजिंक्‍य सांस्कृतिक संकुलात आयोजिलेल्या संभाजी ब्रिगेडच्या मराठा आरक्षण मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ नवले, महासचिव अतुल पाटील, सी. आर. सावंत, जिल्हाध्यक्ष राजेंद्र जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. गायकवाड म्हणाले, ""ब्रिगेडच्या या लढ्यात आता लोकही सहभागी होऊ लागल्याने हा लढा प्रखरपणे लढला जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेले आरक्षण आम्ही मागत आहोत. यामध्ये कोणत्याही जातीवर अन्याय करण्याचा आमचा प्रयत्न नाही. इतर राज्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षणाची टक्केवारी वाढवून आरक्षण द्यावे, अशी आमची मागणी आहे. कोकणात उर्वरित राज्यात कुणबी मराठा दाखला मिळत आहे. मात्र, पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात दिला जात नाही. याची शासनाने दखल न घेतल्यास गनिमी काव्याने शासनाशी लढा दिला जाईल.'' या वेळी सोमनाथ नवले, अतुल पाटील आदींची भाषणे झाली. दरम्यान, संभाजी ब्रिगेडच्या मराठा आरक्षण संघर्ष अभियान रॅलीचे आज साताऱ्यात आगमन झाले. रॅलीचे स्वागत जिल्हा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी केले. ही रॅली सांगली, कोल्हापूरला जाऊन १५ ऑगस्टला बीड येथे तिचा समारोप होणार आहे. या वेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष बाजीराव देशमुख, मार्गदर्शक युवराज पवार, पी. डी. घोरपडे, जितेंद्र चव्हाण, नानासाहेब यादव, जयवंत मोरे, उपाध्यक्ष रवींद्र ढाणे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

सोलापूर परिसरात तीन बसवर दगडफेक
सोलापूर, ता. ६ - "जय भवानी, जय शिवाजी', "मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे' अशा घोषणा देत काही अनोळखी व्यक्तींनी तीन बसवर दगडफेक केली. या घटना बुधवारी मध्यरात्रीपासून दुपारी चारपर्यंत टप्प्याटप्प्याने घडल्या. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास सोलापूर-पुणे महामार्गावरील कोंडीजवळ बस क्रमांक (एमएच १२ सीएच ८९३०) तर तुळजापूर रस्त्यावरील हगलूरजवळ दुपारी एकच्या सुमारास (एमएच १२ सीएच ७३०९) आणि उत्तर सोलापूर तालुक्‍यातील अकोलेकाटीजवळ सायंकाळी साडेचारच्या (एमएच १३ एआर ९७७३) या तीन बसवर दगडफेक झाली.
अनंत चोंदे यांच्या अटकेचा निषेध
सोलापूर, ता. ६ - संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अनंत चोंदे यांना पुण्यात काल अटक करण्यात आली आहे. त्याचा निषेध करत असून त्यांना त्वरित सोडण्यात यावे, अशी मागणी जिजाऊ ब्रिगेडने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.मराठा समाजाला कुणबी म्हणून इतर मागासवर्गीय समाजात समावेश करावा आणि आरक्षण द्यावे या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. त्यानिमित्ताने चोंदे यांची रथयात्रा पुण्यात आली असता त्यांना अटक करण्यात आली होती. आरक्षणाची मागणी न्याय्य असून त्यासाठी आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे. गेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाच्या मागणीचा विचार करून सहा महिन्यांत निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले होते. सहा महिन्यांनंतर मुख्यमंत्र्यांना भेटले असता त्यांनी वीस दिवसात आदेश काढण्याचे आश्‍वासन दिले. मात्र, मुख्यमंत्र्यांनी आश्‍वासन पाळले नाही. सनदशीर मार्गाला सरकार दाद देत नसल्याने आंदोलनाचे पाऊल उचलावे लागले. त्यामुळे राज्यात आंदोलन होत आहे. शासनाने याकडे लक्ष द्यावे व त्वरित तोडगा काढावा, असे जिल्हाध्यक्षा नंदा शिंदे यांनी म्हटले आहे.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष चोंदे यांना न्यायालयीन कोठडी
उस्मानाबाद, ता. ६ - मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत संभाजी ब्रिगेडचे आंदोलन सुरूच राहील. मला पोलिसांनी अटक केली असली तरी आमचे कार्यकर्ते हे आंदोलन अधिक तीव्रतेने चालूच ठेवतील, असे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अनंत चोंदे यांनी येथे बुधवारी (ता. सहा) पत्रकारांशी बोलताना सांगितले. तालुक्‍यातील हिंगळजवाडी शिवारात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी एसटी बस पेटवून दिल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने मंगळवारी (ता. पाच) रात्री दहा वाजता पुणे येथील बाजीराव चौकात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष श्री. चोंदे यांना अटक करून बुधवारी (ता. सहा) सायंकाळी पाच वाजता उस्मानाबादेतील न्यायालयासमोर हजर करण्यासाठी आणले असता श्री. चोंदे पत्रकारांशी बोलत होते. श्री. चोंदे म्हणाले, ""मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीने आपला अहवाल सरकारला सादर केला आहे, परंतु यासंबंधी निर्णय जाहीर करण्यास सरकार वेळकाढूपणा करीत आहे. आरक्षणाची मर्यादा ५० टक्‍क्‍यांवरून ८५ टक्‍क्‍यांपर्यंत वाढवावी व मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी एक ऑगस्टपासून आम्ही आरक्षण जनजागृती अभियान यात्रा सुरू केली आहे. कुणबी मराठ्यांचा विदर्भात ओबीसीमध्ये समावेश आहे. राज्याच्या अन्य भागांतील मराठा समाजाचा ओबीसी समावेश करण्यासाठी सरकारच्या जुन्या जीआर (शासन निर्णय) निर्णयात मराठा कुणबी असा बदल करण्यासाठी सरकार वेळकाढूपणा करीत आहे. त्यामुळे आम्ही आंदोलन सुरू केले आहे. मराठा समाज हा जगाचा पोशिंदा आहे. त्यांच्यावरच सरकार अन्याय करीत आहे. इतर पक्ष संघटनांनीही या आंदोलनात सक्रिय सहभागी होऊन मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत तीव्र आंदोलन चालू ठेवले पाहिजे, असे आवाहन श्री. चोंदे यांनी केले. श्री. चोंदे यांना उस्मानाबाद न्यायालयात आणणार असल्याचे समजताच मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेडच्या अनेक कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष नेताजीराव गोरे, सेवा संघाचे माजी अध्यक्ष डी. आर. कदम, विक्रमसिंह जालन, जिजाऊ ब्रिगेडच्या सौ. जयश्री चव्हाण, तुळजापूर तालुकाध्यक्षा सौ. शिंदे, पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे श्री. लोखंडे, ऍड. इंगळे आदींसह कार्यकर्त्यांनी श्री. चोंदे यांची भेट घेतली.
आरक्षणाच्या संदर्भात आयोगाचा अभ्यास सुरू - मुख्यमंत्री
लातूर, ता. ६ - मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात आयोग अभ्यास करीत आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी संयमाने वागण्याची गरज आहे. कोणी कायदा हातात घेऊन आंदोलन करणार असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. राज्यात संभाजी ब्रिगेडच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यात काही ठिकाणी जाळपोळीच्या घटनाही घडल्या आहेत. यावर श्री. देशमुख म्हणाले, ""मराठा समाजाला आरक्षण द्यायचे की नाही हा विषय राज्य सरकारला घेता येत नाही. त्यासाठी आयोग आहे. हा आयोग सध्या अभ्यास करीत आहे. आयोगाच्या शिफारसी आल्यानंतरच राज्य मंत्रिमंडळ निर्णय घेत असते. आयोगाला लवकर अभ्यास करून त्यासंदर्भातील अहवाल पाठवा, असे म्हणता येत नाही. सर्व कागदपत्रे, पुरावे पाहूनच आयोग शिफारस करीत असते. सध्या आयोग अभ्यास करीत आहे.'' आंदोलकांनी आक्रमक पवित्रा न घेण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले.

समाजाला आरक्षणसाठी आंदोलन - हिंगोलीत बस फोडली
हिंगोली - वसमत-नांदेड मार्गावर निळा पाटीजवळ आठ ते दहा जणांनी लातूर-वसमत या बसच्या (एमएच२०/डी ५६५०) काचा फोडल्या. ही बस निळा पाटीजवळ आली असताना आठ ते दहा जणांनी बससमोर येवून बस थांबवली. त्यानंतर प्रवाशांना खाली उतरवून बसच्या काचा फोडल्या. यामध्ये बसचे आठ हजार रुपयांचे नुकसान झाले.
संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची शासकीय जीप, बसवर दगडफेक
बीड, ता. ६ - मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडतर्फे राज्यभर आंदोलन करण्यात येत असून, मंगळवारी प्रदेशाध्यक्ष अनंत चोंदे यांना पुणे येथे झालेल्या अटकेच्या निषेधार्थ बुधवारी (ता. सहा) कार्यकर्त्यांनी येथील शासकीय मध्यवर्ती इमारतीच्या आवारातील शासकीय वाहनांवर तसेच पाटोदा व आष्टी तालुक्‍यांत बसवर दगडफेक केली.मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी एक ऑगस्टपासून संभाजी ब्रिगेडतर्फे मराठा आरक्षण रथयात्रा सुरू झाली असून, या रथयात्रेचा राज्यभर दौरा सुरू आहे. या दौऱ्यादरम्यान काही ठिकाणी त्यास हिंसक वळण लागले. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनंत चोंदे यांना मंगळवारी (ता. पाच) पुणे येथे अटक केल्याच्या निषेधार्थ बुधवारी (ता. सहा) ठिकठिकाणी तहसीलसमोर निदर्शने करण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून येथील तहसीलसमोर काही कार्यकर्ते आले. त्यांनी प्रशासकीय इमारतीच्या आवारातील शासकीय जीपवर दगडफेक केली. त्यात पुरवठा विभागाच्या जीपचे (एमएच-२३ बी-८३६) नुकसान झाले. या प्रकरणी सायंकाळपर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल नव्हता. दरम्यान, या संदर्भात संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शरद चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी जनजागृती सुरू असून, त्याअंतर्गत आंदोलन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले
आष्टी, पाटोद्यात बसवर दगडफेक
संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आष्टी तालुक्‍यात कडा साखर कारखान्यासमोर भिवंडी-कल्याण-तुळजापूर (एमएच- १२ डीएच-७८३६) या बसवर दगडफेक केली. चुंबळी फाट्यावरही (ता. पाटोदा) येथे एका बसवर दगडफेक केली.
"मराठ्यांना आरक्षित करा, अन्यथा सुरक्षित राहणार नाही' -
संभाजी ब्रिगेडपुणे, ता. ५ - मराठा समाजाला आरक्षित-सुरक्षित केले नाही, तर राज्यकर्त्यांनाही सुरक्षित राहू देणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अनंत चोंदे यांनी आज दिला.मराठा समाजास आरक्षण मिळावे, या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मराठा आरक्षण रॅलीचे आज पुण्यात स्वागत करण्यात आले. त्या वेळी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. कार्याध्यक्ष प्रवीण गायकवाड, श्रीमंत कोकाटे, शांताराम कुंजीर, सारिका भोसले, विजयकुमार ठुबे, संतोष शिंदे, तुषार काकडे, अर्चना जगताप, वासंती नलावडे, संतोष नानवटे, प्रभाकर दुर्गे आदी या वेळी उपस्थित होते. चोंदे म्हणाले, ""आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाच्या निकषात बसूनही मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, ही खेदाची बाब आहे. सध्याचे सरकार हे प्रस्थापितांचे सरकार असून, तातडीने आरक्षण जाहीर करावे, अन्यथा संघर्ष तीव्र करण्यात येईल.'' दरम्यान, आरक्षण मिळविण्यासाठी मराठा समाजानेही जुनी मानसिकता बदलण्याची गरज आहे, असे मत प्रवीण गायकवाड यांनी व्यक्त केले. समाजात या बाबत अज्ञान आहे आणि दुसरीकडे राजकीय इच्छाशक्ती नाही. त्यामुळे आरक्षण मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची गरज आहे. साठ टक्के समाज हा दारिद्य्ररेषेखाली असेल, तर तो फक्त शेतीवर जगू शकत नाही; त्याला उभा करण्यासाठी आरक्षणासारख्या सवलतींची गरज आहे, असेही ते म्हणाले. सरकारने सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्यावे आणि इतर मागासवर्गाच्या आरक्षणात वाढ करावी, अशी मागणी कोकाटे यांनी केली.

ता. ५ - येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात उभ्या करण्यात आलेल्या शासनाच्या दोन जीप मंगळवारी (ता.पाच) रात्री जाळण्यात आल्या. यात एक जीप पूर्ण जळून खाक झाली आहे. घटनास्थळी मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असे संभाजी ब्रिगेडचे पत्रके पोलिसांना मिळाली आहेत. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी ः येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात सर्वच शासकीय विभागाची वाहने रात्री लावली जातात. या कार्यालयाच्या मागच्या बाजूस मंगळवारी रात्री कृषी विभागाची एमएच २४, ए ७५१२ ही जीप व मत्स्य विभागाची एमएच २४ एन ७८४ ही जीप लावण्यात आली होती. मंगळवारी रात्री या दोन्ही जीप अज्ञात व्यक्तींनी जाळल्या. यात कृषी विभागाची जीप पूर्णपणे जळून खाक झाली आहे. तर मत्स्य विभागाच्या जीपचे समोरच्या काचा फोडून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.
संभाजी ब्रिगेडचे आंदोलन तापले...
औरंगाबाद, ता. ५ - मराठा समाजाचा ओ.बी.सी.प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडतर्फे राज्यभर तीव्र आंदोलन सुरू असून आंदोलन दिवसेंदिवस तापत आहे. संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या औरंगाबाद विभागातील चार बसची जाळपोळ, तोडफोड केल्यामुळे तब्बल २० लाख रुपयांवर नुकसान झाल्याचे सूत्रांनी सांगितले. मंगळवारी (ता. पाच) सायंकाळी साडेचारच्या सुमारास औरंगाबाद-कोपरगाव या बसवर संतप्त जमावाने दगडफेक केल्याने बसमधील चार प्रवासी जखमी झाल्याचे सूत्रांनी सांगितले. बसमधील प्रवाशांना खाली उतरवून जांभाळा येथे संतप्त जमावाने बसच्या काचा फोडून बस पेटवून दिली. यामध्ये बसमधील सीट व टायरसह अर्धी बस जळाली. तसेच औरंगाबाद विभागातील हिंगोली-पुणे ही गाडी पांढरी पूल येथे संतप्त कार्यकर्त्यांनी पेटवून दिल्याने बसचे ३ लाखांचे नुकसान झाले. परभणी-पुणे ही गाडी फोडून टाकली. या गाडीचे १ लाखाचे नुकसान झाले, तर तीन महिन्यांपूर्वीच विभागाला मिळालेली नवी कोरी एशियाड गाडी संतप्त कार्यकर्त्यांनी संपूर्णत: जाळल्याने भस्मसात झालेल्या बसचे १५ लाखांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, सदर घटना नगर विभागाच्या अंतर्गत घडल्याने नगरचे विभाग नियंत्रक पोलिस ठाण्यात तक्रार करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
आरक्षण मिळेपर्यंत लढा चालूच ठेवणार - पुरुषोत्तम खेडेकर
ता. ४ - मराठा समाजाचा "ओबीसी'मध्ये समावेश होईपर्यंत लढा चालूच राहणार असल्याचे मराठा सेवा संघाचे संस्थापक-अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी आज येथे सांगितले. "ओबीसी' आरक्षणाबाबत त्यांनी येथे बैठक घेतली. संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कदम, शिरीष जाधव, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक अमोल शिंदे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, जिजाऊ ब्रिगेडच्या नंदा शिंदे, महेश चव्हाण आदी उपस्थित होते. श्री. खेडेकर म्हणाले, ""आरक्षणाचे आंदोलन मराठा सेवा संघ किंवा संभाजी ब्रिगेडपुरते मर्यादित राहिलेले नसून ती आता लोकचळवळ झाली आहे. त्यामुळे त्यामध्ये महिला, विद्यार्थ्यांसह समाजाच्या सर्व थरातील लोक सहभागी होत आहेत. संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. त्यासाठी सर्व प्रकारची आंदोलने करू. त्यामध्ये सहभागी होणाऱ्या सर्वच घटकांची जबाबदारी संघ घेईल. त्यांनी कोणत्याही प्रकारे आंदोलन केले, तरी संघ त्यांच्या पाठीशी राहील.'' ते पुढे म्हणाले, ""मराठा लोकप्रतिनिधींनी राज्यकर्ते म्हणून या प्रश्‍नाकडे पाहावे. लोकांची मागणी म्हणून त्याला प्रतिसाद द्यावा. त्यांनी तसा तो दिला नाही, तर समाजातील लोक त्यांच्याबाबतीत विचार करतील. सर्वच पातळ्यांवर आंदोलन सुरू राहणार असून कोणताही भेदभाव न करता संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत हे आंदोलन सुरू राहील.''
तहसीलदारांची जीप फोडली
शिर्डी मराठी समाजाला इतर मागासवर्गाचा दर्जा (ओबीसी) द्यावा, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडने सुरू केलेले आंदोलन चांगलेच भडकले असून, नगर जिल्ह्यात रोजच कुठे-न-कुठे तोडफोड सुरू आहे. सोमवारी सकाळीही संगमनेर तहसीलदारांची जीप फोडून ती जाळण्याचा प्रयत्न झाला. पोलिस पोहोचण्याआधीच आंदोलक पसार झाले. मराठा समाजाच्या ओबीसी दर्जाबाबत सरकारने लवकर निर्णय न घेतल्यास संपूर्ण राज्यात आंदोलन पुकारण्याचा इशारा संघटनेने दिला होता. सोमवारच्या घटनेत पोलिसांनी अज्ञात कार्यर्कत्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. दोनच दिवसांपूवीर् प्रवरानगरात पालकमंत्री वळसे-पाटील यांच्या सभेत एका तरुणाने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता.

'संभाजी ब्रिगेड'ची पंढरपुरात दगडफेक
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या 'बाइक'स्वार कार्यर्कत्यांनी रविवारी पंढरपुरात ३ एसटी गाड्यांची तोडफोड केली. यामध्ये आठ जण जखमी झाले. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर संभाजी ब्रिगेडने रविवारी अचानक दगड हाती घेत एसटी गाड्यांना लक्ष्य केले. पंढरपूर-नगर रस्त्यावर कार्यर्कत्यांनी नगरकडे जाणाऱ्या व पटवर्धन कुरोलीकडे जाणाऱ्या दोन एसटी बसच्या काचा फोडल्या. प्रवाशांनी खचून भरलेल्या या गाड्यांवर हल्ला चढवल्याने एकच घबराट उडाली. त्याचवेळी पंढरपूर-सोलापूर रस्त्यावरही या कार्यर्कत्यांनी असाच गोंधळ घातला. तेथेही एक एसटी बस फोडली. दगडफेकींच्या या घटनांमुळे एसटी प्रशासनाने बससेवा स्थगित केली.



महाराष्ट्रभर "रास्ता रोको" यशस्वी....मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आदि भागात जोरदार निदर्शने ....मोर्चे...रास्ता रोको....दोन दिवसात निर्णय न झाल्यास पुढील आंदोलन शिवनीतिने करण्याचा संभाजी ब्रिगेड्चा इशारा.....
एक मराठा....लाख मराठा..... ,जय जिजाऊ ...जय शिवराय... ,भांडारकर तो झांकी है...अभी तो बहोत कुछ बाकी है... ,मराठ्यांना आरक्षण मिलालेच पाहिजे... ,तुमचं आमचं नातं काय...जय जिजाऊ जय शिवराय.... अश्या घोषनानी अवघा परिसर दुमदुमून गेला होता...
मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही..असा नाराजीचा सुर मराठा समाजातून उमटत आहे... आरक्षण प्रश्न अधिकच गंभीर होत चालला आहे...

वाचा -







आरक्षणासाठी मराठे पेटले....


मराठा समाजाच्या आरक्षणासाठी महाराष्ट्रभर "रास्ता रोको" दि १०-जुलै-२००८ स.१०:०० वाजता.












संभाजी ब्रिगेडचे २२ जूननंतर राज्यभर आक्रमक आंदोलन-

अनंत चोंदे


ता. २९ - मराठा समाजाला आरक्षण देण्यासंबंधीचा निर्णय येत्या २० दिवसांत न घेतल्यास २२ जूननंतर राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अनंत चोंदे यांनी दिली.मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या समाजाचा "ओबीसी'मध्ये समावेश करावा, या मागणीसाठी संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या पाठपुराव्याची माहिती देण्यासाठी गुरुवारी (ता. २९) चोंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक चक्रधर शेळके, जिल्हाध्यक्ष दत्ता कवडे, तालुकाध्यक्ष रोहित पडवळ, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र कदम, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य डी. आर. कदम, भुतेकर, विक्रमसिंह जालन, संपत भिसे उपस्थित होते. श्री. चोंदे म्हणाले, की मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या समाजाचा "ओबीसी'मध्ये समावेश करावा, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने नोव्हेंबर २००७ मध्ये नागपूर येथे विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या वेळी बेमुदत उपोषण सुरू केले होते. दोन दिवस सरकारने या उपोषणाची दखल घेतली नव्हती. त्यामुळे संघटनेने तिसऱ्या दिवसांपासून राज्यभरात तीव्र आंदोलन केले होते. याचा परिणाम म्हणून २४ नोव्हेंबर २००७ रोजी शिक्षणमंत्री वसंत पुरके, परिवहन राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी सहा महिन्यांत निर्णय घेण्यात येईल, असे लेखी आश्‍वासन देण्यात आले होते.
दरम्यान, या प्रश्‍नावर सरकारशी पत्रव्यवहार सुरू ठेवण्यात आला होता. सरकारने दिलेल्या आश्‍वासनाची मुदत २४ मे रोजी झाली आहे. या सहा महिन्यांत सरकारने या मागणी संदर्भात कोणताही ठोस निर्णय घेतला नसल्यामुळे दोन जूनपासून आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यादृष्टीने आंदोलनाची तयारीही करण्यात आली होती, असे सांगून चोंदे म्हणाले त्यानंतर शिक्षणमंत्री पुरके यांनी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना पत्र देऊन संघटनेच्या या इशाऱ्याची दखल घेऊन ३० मेपूर्वी निर्णय घेण्याची विनंती केली होती. आमदार सौ. रेखा खेडेकर यांनीही पुरके यांना २७ मे रोजी पत्र देऊन सरकारने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली होती. बुधवारी (ता. २८) मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीला मला आणि चक्रधर शेळके यांना बोलाविण्यात आले होते. बापट आयोगाचा औरंगाबाद, लातूर जिल्ह्याचा अहवाल यायचा असल्याने यासाठी किमान १५ ते २० दिवस लागतील. त्यानंतर लगेच बैठक घेण्याचा निर्णय, मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या या बैठकीत घेण्यात आला. सरकारने २० दिवसांची मुदत मागून घेतल्यामुळे दोन जून रोजीचे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे, असेही ते म्हणाले. या २० दिवसांच्या आत सरकारने कोणताही ठोस निर्णय घेतला नाही तर संभाजी ब्रिगेड राज्यभर तीव्र, आक्रमक आंदोलन करणार आहे. त्यासाठी समाजबांधवांनी सतर्क राहावे, असे आवाहन श्री. चोंदे यांनी केले आहे. मराठा समाजाला आरक्षण देणे, या समाजाचा "ओबीसी'मध्ये समावेश करण्याचा शासन निर्णय जोपर्यंत होणार नाही, तोपर्यंत संघर्ष सुरूच ठेवण्यात येणार आहे, असे श्री. चोंदे यांनी सांगितले.


Maratha Community Demanding O.B.C. Reservation.

मराठा व कुणबी ह्या दोन भिन्न जाती नसून एकच आहे- संभाजी ब्रिगेड
मराठा समाज कुणबी असल्याचे पुरावेमराठा समाज कुणबी असल्याचे असंख्य पुरावे देता येतील. वास्तविक पाहता मराठा व कुणबी या दोन्ही भिन्न जाती नसून एकच आहे. (सन १८८१ पासून १९३१ पर्यंतच्या ५० वर्षाच्या गॅझेट मध्ये मराठा कुणबी असल्याचा उल्लेख केला जातो)
पुरावा १ :- १९८१ च्या जनगणनेत मराठ्यांचा कुणब्यांमध्ये समावेश केला होता.
संदर्भ :- Bombay Gazetter Satara, Vol. XIX, Page 75, Marathas are found all over the district. The 1981 Census includes them under "Kunbi" from whom they do not form a separate caste.

पुरावा २ :- मराठा व कुणबी यांचा समावेश कुणबी ह्या शब्दात होतो. या दोघांमध्ये भेद दर्शविणे कठीण आहे. या दोघांमध्ये परस्पर रोटी व बेटी व्यवहार चालतो. त्यांचे रूप, रंग, धर्म कर्म, रीती रिवाज यात काही फरक नाही.
संदर्भ :- Bombay Gazeteer, Poona Vol. XVIII, Part-I. The term kunbi includes two main classes "Kunbis" and "Marathe" between whom it is difficult to draw a line. Maratha and Kunbi eat together, intermarry and do not differ in appearance, religion and caste.

पुरावा ३ :- "मराठा" व "कुणबी" यांच्यातील लग्न वैध असल्याचा व मराठा व कुणबी एकच असल्याबद्दल कोर्टाचा निकाल.
संदर्भ :- Civil Suit No. 2 of 1920 decided on 25-10-1921 to judgement Maratha caste is genus while Kunbi caste is in species and that marriage between Maratha and Kunbi are Kunbi and perfectly valid in law.

पुरावा ४ :- Gazetter of India M.S. Parbhani Dist. Page 103 : No Permanent division between Kunbi and Maratha,
वर उल्लेख केलेल्या पुराव्यावरून हे सिद्ध होते की, 'मराठा' व 'कुणबी' ह्या दोन भिन्न जाती नसून एकच आहे. शेती करणारे मराठा म्हणजे कुणबी.संदर्भ :- मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने दिलेला निर्णय आहे. व अमरावती कोर्टाच्या निर्णयानुसार शेती करणारा हा कुणबी हा स्पष्ट होता.

शेती करणारा मराठा म्हणजेच कुणबी हे सिद्ध करणारे पुरावे
पुरावा १ :- Gazetter of India, M.S. Aurangabad District Page 293. The Kunbis from the main body of agricultural population the members of which by heridatary occupation are farmers and tillers of soil.

पुरावा २ :- Gazetter of India, M.S. Wardha Dist. Page 148 - "Kunbi has come to be the accepted type of all Maratha cultivator"
सर्व मराठा शेतकरी कुणबी आहेत.

पुरावा ३ :- Gazetter of India, M.S. Wardha Dist. Page 160 - "Kunbi are regular agricultural caste of district"
कुणबी ही नियमित शेती करणारी जात आहे.

पुरावा ४ :- Gazetter of India, M.S. Nagpur Dist. Page - The Kunbi is traditional. The term Kunbi has become the generic name for professional cultivator.
कुणबी हे परंपरागत व्यवसायाने शेतकरी आहेत.

सर्व संदर्भाद्वारे हे सिद्ध होते की, शेती करणारा मराठा म्हणजेच "कुणबी" म्हणून महाराष्ट्रातील सर्व शेती करणा-या मराठ्यांना "कुणबी" या जातीने ओळखले जावे.
श्री. एफ.ई. इथावेन यांनी त्यांच्या मुंबईच्या जाती व जमाती खंड-३ या पुस्तकात 'कुणबी' या नावाखाली येणा-या जातींचे विश्लेषण केले आहे ते असे.


वर्ग-१ :- मराठा कुणबी - शेती करणारे मराठा यांचा समावेश या वर्गात होतो. यांनाच कुळवाडी असे म्हणतात.

वर्ग-२ :- इतर मराठा - यात गवंडी, कुंभार, सुतार, परीट यांचा समावेश होतो.

पुरावा :- Imperial Gazetter of India (New edition) Volume XVI. "Maharashtra is country of Maratha who form 55 percent of its population. The term Maratha is not reserved for the old fighting stock a hardy and various class once the terror of India now merged very largly in the cultivating class known as kunbi".

कुणब्यांनाच मराठा म्हटलेले जाते असा पुरावा
पुरावा :- तत्कालीन हैद्राबाद संस्थानाने प्रसिद्ध केलेले गॅझेटीअर
The term Maratha is now applied principally to the are Kunbis. It should be unframed to the military family of the countries. The Kunbis from main body of the cultivator population.


पुरावा :- जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती समाज कल्याण, म.रा. पुणे यांनी त्यांच्या क्र.जा.प्र.क्र./अपील क्र. ४/९६/कांताबाई इंगोले ९६-९७/का-२०६३ पुणे, दिनांक १६-१२-९६ व क्र.जा.प्र.प./ अपील क्र. १०/९६/ बा.द.पाटील/९६-९७/का-२०४२, पुणे दि. ०९-१२-९६. या दोन्ही निर्णयात शेती करणारा मराठा म्हणजे कुणबी असा निर्णय दिला आहे. हा निर्णय सर्वांसाठी लागू करावा.

म्हणून "कुणबी व मराठा" एकच असल्याबद्दलचे वर उल्लेख केलेले इतर आणखी पुरावे सापडतील. तसेच शेती करणारा 'मराठा' म्हणजेच 'कुणबी' या जातीचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी मराठा सेवा संघ प्रयत्नरत आहे. ह्याच आधारावर महाराष्ट्रात मराठ्यांना सरसकट कुणबी संबोधून शासनाच्या ओ.बी.सी. मध्ये लागू असलेल्या सर्व शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय इत्यादी सवलती त्वरीत द्याव्यात. अशी मागणŀ संभाजी ब्रिगेडचे राज्याध्यक्ष अनंत चोंदे, कार्याध्यक्ष प्रवीण गायकवाड, सचिव मनोज आखरे आणि हजारो कार्यकर्त्यांनी नोव्हेंबर २००७ च्या नागपूर हिवाळी अधिवेशनाचे वेळी केली. ज्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक आश्वासन दिले होते.पण ह्या आश्वासनावर कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही, त्यामुलेमराठा समाजातील अनेक संघटनामध्ये असंतोष पसरला आहे.संभाजी ब्रिगेड ने २ जूनला "महाराष्ट्रबंद" चे आवाहन केले होते.त्यावर मुख्यमंत्र्यानी २० दिवसच्या आत निर्णय देण्याचे काबुल केले होते.२२ जून पर्यंत कार्य वही अपेक्षित आहे,पण त्या नंतर अधिक आक्रमक आंदोलन करण्यात येणार असल्याचे संभाजी ब्रिगेड , मराठा महासंघ , मराठा सेवा संघ , छावा मराठा संघटन आदि संघटनानी म्हटले आहे.तसेच हे आंदोलन गुज्जर आंदोलनापेक्षा तीव्र करण्याचा सनसणित इशारा ह्या संघटनानी दिला आहे
तसेच ह्या आंदोलनाला इतर २५ संघटनानी पाठिंबा दिला आहे व एकून आरक्षणाची मर्यादा वाढविन्याचीही मागणीही केली आहे.मर्यादा वाढविन्याच्या मागणीचे जोरदार स्वागत इतर समाजातून होत आहे.
SAMBHAJI BRIGADE ,MARATHA MAHASANGH,CHHAWA AND OTHER MARATHA UNIONS DEMANDING RESERVATION IN OBC QUOTA,

MARATHAS ARE KUNBIS.
KUNBIS ARE MARATHAS.

मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही - रामदास आठवले
ता. २७ - मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास असणाऱ्यांना आरक्षण देण्यास रिपब्लिकन पक्षाचा विरोध नाही.मात्र, मागासवर्गीय समाजाला घटनेने दिलेल्या आरक्षणाला धक्का लावू नये, असे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
ते म्हणाले, ""सन १९८३- ८४ मध्ये मंडल आयोगापुढे दलित पॅंथरच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या मागास असणाऱ्या कुणबी समाजाला आरक्षण द्यावे, ही मागणी आम्ही केली होती. घटनात्मकदृष्ट्या मागासवर्गीय समाजाला १५ टक्के व आदिवासींना साडेसात टक्के (७.५) आरक्षण आहे. त्याला धक्का लागू नये, एवढी काळजी आम्ही घेत आहे.

MARATHA OBC RESERVATION LINKS-

http://www.freewebs.com/akshalok/itihaas.htm

http://www.shivdharma.com/campaign_reservation.asp

http://shivadharmee.weebly.com/shivadharma-literature.html (pdf files are there)


मराठा समाजाच्या आरक्षणासाठी महाराष्ट्रभर "रास्ता रोको" दि १०-जुलै-२००८ स.१०:०० वाजता.